Sunday 16 September 2007

Idol of Ganesha desecrated at Bambolim; cops clueless

vandalized Bambolim templePANJIM, SEPT 16 – A day after Ganesh Chaturti celebrations began, anxiety and tension gripped Bambolim when a temple and the idol of Lord Ganesha were damaged and desecrated.

The incident is reported to have taken place at Shiv-Krishna Devasthan, situated near the new nursing college, where the 11- day Sarvojanik Ganesh Utsav celebrations are underway.
According to police reports, the temple, that was locked at around 9.30 pm after Saturday’s worship, was found vandalized Sunday morning.
The lock on the temple door was found broken and religious items, including the three-feet tall idol of Lord Ganesha, badly damaged. Several pictures were also seen scattered on the floor. Interestingly, the cashbox was found intact.
Though the police dog squad was pressed into service, no clues could be gathered. The Agassaim police have registered a case against unknown persons.
Early Sunday morning, a large CRPF battalion was deployed at the site to counter any eventuality as people began rushing to the temple on receiving the news.
The police also cordoned off the area as some groups allegedly attempted to hold condemnatory meetings.
The North District administration convened a meeting of the temple committee in the afternoon, following which the damaged idol was immersed. Thereafter, a new idol of Lord Ganesha was installed.
Additional Collector Swapnil Naik who was present at the meeting said, “We acceded to the committee’s request for police protection,” adding that compensation demands for damages caused will be forwarded to the Government। MLA Francis Silveira also visited the site।

बांबोळीत गणेशमूर्तीची बिटंबणा
पणजी, ता. १६ - बांबोळी येथील शिवकृष्ण मंदिरातील सार्वजनिक गणेश मूर्ती, शिवलिंग, नंदी आणि मंदिराशेजारच्या घुमटीवरील कळसाचा अज्ञातांनी विध्वंस केला.
.....
गणपतीच्या मातीच्या मूर्तीची पूर्णतः मोडतोड केली. नंदीही उखडून टाकला. जड वस्तूचा प्रहार करून शिवलिंग व पिंडीही दुभंगून टाकली. मंदिरातील पितळी समया, देवतांच्या तसबिरीही माथेफिरूंच्या या कारवाईतून वाचू शकल्या नाहीत. काल रात्री दहा ते आज सकाळी सात या वेळेत हा प्रकार घडला व यामुळे आज त्या भागात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बांबोळीला पणजीहून मडगावला जाताना उजवीकडे हे छोटेखानी मंदिर आहे. पोर्तुगीजकाळापासून तेथे शिवलिंग होते. मंदिरात गोकुळाष्टमी व शिवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणी सोमवारला सत्यनारायण महापूजा होते. याशिवाय दर सोमवारी ग्रामस्थ मंदिरात भजनही करतात. तेथे गेल्या दशकात छोटेखानी मंदिर आकाराला आले. गेल्या काही वर्षांत मंदिरासमोर पत्र्याची शेडही उभी राहिली आहे. २००२ मध्ये मंदिराशी संलग्न भाविकांनी शिवकृष्ण देवस्थान ट्रस्ट स्थापन केला. पाच वर्षांपासून मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता. गेल्या वर्षापर्यंत त्या मूर्तीचे विसर्जन पाचव्या दिवशी करण्यात येत होते. यंदा पाचवे वर्ष असल्याने अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचे ट्रस्ट व ग्रामस्थांनी ठरविले होते. भाविकांपैकी बहुतेकांना सुतक असल्याने त्यांनी पूजेची जबाबदारी गणपत भटजींकडे सोपविली होते. ते रात्री दहा वाजता पूजा करून घरी निघून गेले. त्यानंतर हा प्रकार घडला.
त्या परिसरात खणून केबल घालण्याचे वा तत्सम काम चालते. त्या कामावरील मजूर नेहमीप्रमाणे सकाळी दर्शनासाठी मंदिरात सात वाजण्याच्या सुमारास आले. त्यांच्या नजरेस हा प्रकार पडताच ते घाबरले. त्यांनी याची खबर गावात दिली. ग्रामस्थांकडून हा प्रकार ट्रस्टचे सचिव कमलाकांत काणकोणकर यांना कळला. ते सर्वप्रथम आठ वाजता मंदिरात आले.
त्यांनी "गोमन्तक' ला सांगितले, की गणपतीची मूर्ती होती असे सांगावे लागण्याइतपत मूर्तीवर प्रहार करण्यात आले होते. मातीच माती झाली होती. मूर्तीसमोरील तीन फुटी पितळी समईही तोडण्यात आली. वात लावतात तो भाग मुख्य भागापासून अलग करण्यात आला होता. मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तर तोडण्यात आलेच शिवाय मंदिराच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या दत्तात्रय, श्रीकृष्ण आदी देवतांच्या तसबिरीही फोडून टाकण्यात आल्याने काचांचा खच पडला होता. नंदीही फोडण्यात आला होता. त्यावरूनच गाभाऱ्यात काय घडले असावे याचा पुरेसा अंदाज येत होता. मंदिरापासून जवळच असलेल्या घुमटीच्या कळसावरही जड वस्तूचा प्रहार करण्यात आला होता. विटंबना करण्यात आलेल्या मूर्तीच्या जागी दुपारी साडेचार वाजता नव्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली.
याची खबर पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. आगशीचे पोलिस निरीक्षक सलीम शेख यांनी पंचनामा केला. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी वेणू बन्सल उपस्थित होते. जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनीही या मंदिराला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या दुपारी झालेल्या बैठकीसही ते उपस्थित होते.
पंचनामा सुरू असताना तेथे उपस्थित बन्सल यांनी पोलिसांना सर्व गोष्टी तेथून त्वरित हटविण्याचे आदेश दिले. त्याला उपस्थित राजेंद्र वेलिंगकर व इतर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. ग्रामस्थांनी दुपारी साडेचार वाजता मंदिरात बैठक बोलावली होती. तोवर आहे तीच स्थिती कायम ठेवावी असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्याला बन्सल तयार नव्हते. त्यामुळे इतस्ततः विखुरलेले साहित्य गोळा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी अटकाव केला. त्यानंतर तेथे उपस्थितांपैकी मंदिराशी संबंधित कोण याची चौकशी पोलिसांनी सुरू केली. वेलिंगकर यांचा या मंदिराशी संबंध काय असेही बन्सल यांनी विचारले. त्यावर एक हिंदू म्हणून मी या मंदिरात येत होतो असे वेलिंगकर यांनी उत्तर दिले. शब्दाने शब्द वाढत चालला होता. त्यावर अधीक्षकांना भेटू असे सांगून बन्सल यांनी ग्रामस्थांना पणजीत आणले असे वेलिंगकर यांनी "गोमन्तक' ला सांगितले. ते म्हणाले, मी साडेचार वाजेपर्यंत त्या मंदिर परिसरात जाणार असे पोलिसांनी जबरदस्तीने माझ्याकडून लिहून घेतले. स्वातंत्र्याचा हा संकोच आहे. ग्रामस्थांना सत्यस्थिती समजावी म्हणून त्या भागाच्या साफसफाईस आक्षेप घेण्यात आला होता.
राज्यात मूर्तिभंजनाचे प्रकार वाढीस लागले असताना पोलिस त्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. ते अपयश झाकण्यासाठीच असे पवित्रे ते घेत आहेत. घटनास्थळी बजरंग दलाचे राज्यप्रमुख विनायक च्यारीही ग्रामस्थांशी चर्चा करताना दिसून आले.
-------------------------------------------------------------
चोरीप्रकरणातून तोडफोड नव्हे
दरम्यान, या शिवमंदिरातील गणेशमूर्ती, नंदी व शिवलिंग - पिंडीची तोडफोड करण्यामागे कोणाचा हात असू शकतो याबाबत चौकशी सुरू आहे. हे प्रकरण चोरीचे नाही, कारण मंदिरातील फंडपेटीचे कुलूप तोडण्यात आले नव्हते वा ती लंपासही करण्यात आलेली नाही. मंदिरात झालेला तोडफोडीचा प्रकार पाहता यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मंदिराच्या समितीचे सचिव कमलाकांत मं. काणकोणकर यांनी दिलेल्या जबानीत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. या मंदिरातील सदस्यांशी किंवा कोणाशी वाद झालेला नाही, असे त्यांनी म्हटले असल्याचे आगशी पोलिसांनी सांगितले. तोडफोड करणारी व्यक्ती माथेफिरू असू शकत नाही. त्याने भान ठेवूनच हा सगळा प्रकार केला आहे. घटनास्थळी पोलिस श्‍वानाला पाचारण करण्यात आले. मंदिरातील तोडफोड झालेल्या काही वस्तूंचा वास या श्‍वानाला देण्यात आला. त्यानुसार हे श्‍वान या मंदिराच्या मागील बाजूने पुढे सरकत मानसोपचार इस्पितळाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरले. तेथून ते इस्पितळाच्या बाह्यरुग्ण कक्षाच्या मागील बाजूने इस्पितळ वसाहतीकडून एका पायवटेकडे पोचले. सुमारे चाळीस ते पन्नास मीटर अंतर हे श्‍वान पुढे चालत जाऊन तेथेच घुटमळू लागले. या ठिकाणी संशयिताचे काही धागेदोरे सापडले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
-------------------------------------------------------------

No comments: